जिल्हा परिषद पदाधिकाऱ्याकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग..!

0
2142

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार महिला प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, विजय भोजे हे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी माझ्याकडे ‘दिवाळी भेटी’ची मागणी केली. आणि मला ती देण्यासाठी २४ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांच्या घरी बोलावले. मी मुलीसह घरी गेले असता अर्धनग्न अवस्थेत बसलेल्या भोजे यांनी माझा विनयभंग केला. त्यानंतर मी तिथून घरी आले. मात्र, त्यांनी रात्री मला पुन्हा फोन करुन माझ्याशी अश्लिल संभाषण केले. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांकडे या प्रकाराची तक्रार केली असता त्यांनी माझी समजूत काढल्याने मी पोलीसात तक्रार दिली नव्हती. मात्र, त्यांनी आजअखेर मला शिंगणापूर कुस्ती केंद्रातील मॅट प्रकरणावरुन तसेच माझ्याकडे अश्लिल हेतूने पाहून वेळोवेळी मानसिक त्रास दिला आहे.

या महिलेच्या फिर्यादीनुसार विजय भोजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.