कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वत्र कोरोनाचे थैमान असताना एकाच व्यक्तीला दुसऱ्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना ३५ दिवसांपूर्वी पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

     

आवाडे कुटुंबातील एकूण १८ जणांना याआधी कोरोनाची बाधा झाली होती. पण योग्य त्या खबरदारी नंतर सगळे कोरोनामुक्त झाले होते. पण काल (बुधवार) राहुल आवाडे यांना त्रास जाणवू लागण्याने, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. आज (गुरुवार) त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आवाडे कुटुंबाला कोरोनाने धक्का दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर दुसऱ्यांना होणे. ही कदाचित पहिलीच घटना असावी. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद देत, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.