जिल्हा परिषद सीईओ संजयसिंह चव्हाण यांना पितृशोक

0
151

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे वडील रामराव उर्फ बाळासाहेब गणपतराव चव्हाण (वय ८६) यांचे भोळी, (ता. खंडाळा) येथील राहत्या घरी आज (शनिवार) निधन झाले.

ते खंडाळा तालुका काँग्रेसचे २० वर्षे अध्यक्ष, तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्षपद सांभाळले होते. तसेच त्यांनी स्वत:च्या घरात ८ वी ते ११ वी पर्यंत रयत शिक्षण संस्थेची शाळा १९७१ साली सुरू केली होती. शिरवळ येथे माजी विद्यार्थी संघटनेमार्फत महाविद्यालय चालू केले. ते खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान चे संस्थात्मक संचालक होते. सुमारे ५० वर्षे ते सामाजिक, राजकीय जीवनात सक्रीय होते.