जिल्हा परिषदेकडून छ. शाहू पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे जाहीर…

0
218

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात राबविण्यात विकासकामांमध्ये येणाऱ्या विविध जि. प. व व पंचायत समिती सदस्य, जि.प. कर्मचारी यांचे यांचाही सहभाग मोठा असतो. जि.प. व पं.स.सदस्य व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा व पुढील काम करणेस प्रोत्साहन मिळावे या करिता जिल्हा परिषदेकडून २०२०-२१ चा जिल्हा परिषद कर्मचारी (वर्ग ३) मधील (ग्रामसेवक व शिक्षक सोडून) इतर संवर्गातील १६ कर्मचाऱ्यांची राजर्षि छत्रपती शाहू पुरस्कारासाठी निवड करणेत आली. यासाठी गोपनीय अहवालातील अतिउत्कृष्ट शेरे, समयसूचकता, प्रशासकीय कामकाजाची माहिती, निर्णयशक्ती, नियमांचे ज्ञान, सामाजिक व शैक्षणिक कलागुण, सचोटी व प्रामाणिकपणा हे निकष विचारात घेण्यात आले आहेत.

प्रतिवर्षी छत्रपती शाहू जयंतीच्या निमित्ताने पुरस्कारासाठी निवड करणेत आलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी यांना गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्रक व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सपत्नीक सन्मानित करणेत येते.

सदर पुरस्कार निवड आज (शुक्रवार) स्थायी समिती सभेमध्ये अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, सर्व विषय समित्यांचे सभापती आणि काही सदस्य, खातेप्रमुख, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –

(कर्मचारी नाव, पदनाम विभाग/ कार्यालयाचे नाव या क्रमाने)

सुमन सुभेदार – वि.अ. शिक्षण श्रेणी २/३   गट शिक्षण विभाग, पं. स. चंदगड, नारायण चांदेकर  अधीक्षक- प्रशासन विभाग,  जि.प., प्रशांत पाटील, व. सहायक ग्रामीण विकास यंत्रणा, नंदकुमार पार्टे – कनिष्ठ सहायक शिक्षण विभाग, पं. स.राधानगरी, आनंदा चव्हाण, वाहन चालक (विभागून) प्रशासन विभाग जि.प., सुभाष लांबोरे, ग्रा.पं. विभाग जि.प., संभाजी हंकारे – सहा.लेखाधिकारी व कनिष्ठ लेखाअधिकारी (विभागून) अर्थ विभाग जि. प., शांताराम पाटील – आरोग्य विभाग, जि. प., संतोष पाटील – सहाय्यक अभियंता श्रेणी – २ उप विभाग (बांधकाम) पं.स. राधानगरी, शिवाजी कोळी – विस्तार अधिकारी (कृषि) पं. स., शिरोळ, विनायक पाटील –  पशुधन पर्यवेक्षक, पं. स. गडहिंग्लज, प्रविण मुळीक – आरोग्य सेवक, केंद्र निगवे प्रा.आ.केंद्र, इस्पुर्ली (ता. करवीर), अमोल कोळी – आरोग्य सहायक (पु) आ. केंद्र, टाकळी, ता. शिरोळ, अनघा पाटील – आरोग्य सेवक, उप केंद्र पाडळी बु., प्रा. आ. केंद्र, भुये (ता. करवीर), बेबीताई घोलप – आरोग्य सहायक, प्रा. आ. केंद्र, करंजफेण, (ता. शाहूवाडी), रामचंद्र गिरी – औषध निर्माण अधिकारी – प्रा. आ. केंद्र, मिणचे खु. (ता. भुदरगड)