कोल्हापूर (प्रतिनिधी) : तायक्वांदो हा खेळ आत्मसंरक्षणासाठी खूप महत्त्वाचा आहे. या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यात कोल्हापुरातील झेनिथ तायक्वांदो अॅकाडमीचा मोलाचा वाटा आहे. या अॅकांडमीचे खेळाडू भविष्यात ऑलिंपिकमध्ये चमकतील असा विश्वास आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी झेनिथ तायक्वांदो अॅकाडमीला आमदार निधीतून दिलेल्या ३  लाखांच्या निधीतून घेतलेल्या साहित्याचे हस्तांतरण करण्यात आले. तसेच ५२ खेळाडूंना ब्लॅकबेल्ट आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी झेनिथ अॅकाडमीचे देवेंद्र गवळी, दिलीप गवळी, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, क्रीडाधिकारी  बालाजी बरबडे, प्रवीण बोरसे, सुरज देशमुख, युवराज गवळी, अभिजित खतकर, रणजीत पाटील आदी उपस्थित होते.