आजरा (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या १४ व्या वीत्त आयोगाच्या कोवीड-१९ अंतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील ३९ रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा लोकार्पण सोहळा आज (मंगळवार) जि.प.सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

सुनिता रेडेकर यांच्या पाठपुराव्याने आणि आ. राजेश पाटील यांच्या सहकार्याने कोळिंद्रे जि.प. मतदार संघात प्रा.आ.केंद्र मलिग्रे आणि वाटंगी येथे दोन रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या. तसेच रेडेकर यांनी आपल्या फंडातून १५ बेड मंजूर केले. त्याचाही लोकार्पण आज करण्यात आले.  प्रा.आ.केंद्र मलिग्रे येथील रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सुनिता रेडेकर यांच्या हस्ते आणि डॉ.अनिल देशपांडे,डॉ.रविंद्र गुरव, डॉ. कौसर काजी यांच्या उपस्थितीत पार पडला.

तसेच मतदार संघातील दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिकेची सोय झाल्याने रुग्णांची रुग्णवाहिके अभावी होणारी हेळसांड थांबेल. असे मत सुनिता रेडेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी उपसभापती वर्षा बांगडी, आदित्य रेडेकर,मलिग्रेचे माजी सरपंच समीर पारदे, ग्रा. पं. सदस्य सुरेश पाटील, युवराज जाधव, प्रकाश पाटील, रुग्णकल्याण समितीचे सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.