नीतेश राणेंविरोधात युवासेना आक्रमक : भाजप कार्यालयात कुत्रं सोडण्याचा प्रयत्न

0
136

नाशिक (प्रतिनिधी) : पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात आमदार नीतेश राणे यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांच्यावर व्यक्तिगत आरोप केले. तर या आरोपांना उत्तर देताना सरदेसाई यांनी राणे यांनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये युवा सेनेने आज (मंगळवार) राणेंविरोधात तीव्र आंदोलन करून याचे संकेत दिले.

नाशिकमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे पितापुत्रांच्या विरोधात जोरदार आंदोलन करून घोषणाबाजी केली. यावेळी दोन कुत्र्यांच्या गळ्यात नारायण राणे व नीतेश राणे यांच्या नावाची पाटी बांधून ही दोन कुत्री भाजपच्या कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी आंदोलकांना अडवून कुत्री ताब्यात घेतली.   राणे पिता-पुत्र भाजपसाठी कुत्र्याचं काम करत आहेत, असल्याचा आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.