इचलकरंजी बसस्थानकाला छ. शिवाजी महाराजांचे नाव द्या : युवा सेनेची मागणी

0
100

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी एसटी बसस्थानकाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक’ असे नामकरण करावे, अशा मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने इचलकरंजी एसटी आगार वाहतूक नियंत्रक सुवर्णा वड्डे यांना देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावे संबोधित करण्यात आले आहे.

इचलकरंजी एसटी बसस्थानक हे हातकणंगले तालुक्यातील प्रमुख ठिकाण आहे. याशिवाय सीमाभागाला जोडणारे नजीकचे बसस्थानक म्हणून याची ओळख आहे. या बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नामकरण करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. याच अनुषंगाने युवा महाराष्ट्र सेनेच्या शिष्टमंडळाने आगार वाहतूक नियंत्रक सुवर्णा वड्डे यांची भेट घेऊन शिवजयंतीपर्यंत बसस्थानकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक असे करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी वड्डे यांनी निवेदन वरिष्ठांकडे पाठवून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी निश्चित प्रयत्न करु ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे सँम आठवले, कलावती जनवाडे, सचिन बेलेकर, कृष्णा जावीर, विजय कुरणे, महेश कांबळे, अवधूत भोई, आनंद नाईक, राजू दंडी, विशाल बिळगीकर, राजू पसनूर, अभिषेक घोडगिरे, रोहित भोसले, पारस मिरजे, किरण भोसले उपस्थित होते.