टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील गट क्रमांक १२७४/१ यातील सुमारे १५ हेक्टर ४१ आर. गायराण जमिनीत बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. याच्या विरोधात वारंवार तक्रार करुनही कोणतीही कारवाई होत नाही. यासाठी आज (सोमवार) टोप येथील युवकांनी ग्रा.पं. समोर आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

यावेळी टोप ग्रामपंचायत त्या बेकायदेशीर अतिक्रमणावर कोणतीच कारवाई करीत नाही. अजूनही तिथे कांही बांधकामे सुरु आहेत. त्यावर जाणिवपूर्वक दुर्लक्ष करुन कारवाई होत नाही. त्यामुळे आमरण उपोषनाला सुरुवात केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये ही जागा न्यायप्रविष्ट आहे. २०‍१० च्या शासकीय जीआरनुसार काही घरे नियमानुकूल होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्णय येई पर्यत आपले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन आंदोलकांना करण्यात आले.

या आंदोलनात अक्षय पाटील, अनिकेत गुरव, विकास पाटील, अमित पाटील, वैभव भोसले, दीपक पाटील, संजय कोळी, राम पाटील, नवनाथ स्वामी, रोहित गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपोषनाला बसले आहेत.