कुरूंदवाड (प्रतिनिधी) :   रागाने का बघितले याबद्दल विचारणा केल्याच्या कारणावरुन साहील कादर खाटीक (वय २०, रा. लोणार गल्ली, कुरुंदवाड) याला लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांत काल (शनिवार) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, २१ नोव्हेंबर रोजी साहील खाटीक हा रात्रीच्या सुमारास जेवण करुन वंदे मातरम चौकात आला होता. तो एकटाच बसला असताना सिध्दीक सय्यद पटेकरी व सुभान अफसर बाणदार (दोघे रा. कुरुदंवाड) हे दोघे अमन दबासे याच्या मोटारसायकलवरुन साहील खाटीक याच्याजवळ आले. यावेली त्यांनी तू परवा आम्हाला काय बोललास, असे म्हणून साहील याला लाथाबुक्यांनी मारहाण केली.

यावेळी सिध्दीक पटेकरी याने त्याच्या कमरेला ठेवलेला चाकू काढून साहील याच्या पाठीवर मारुन गंभीर जखमी केल्याची फिर्याद साहील खाटीक याने दिली. त्यामुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.