इचलकरंजी येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

0
80

इचलकरंजी  (प्रतिनिधी) : येथील पंचगंगा नदी घाटावरील महादेव मंदिराजवळील  झाडाला एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (सोमवार) पहाटे उघडकीस आला आहे.  महादेव संजय बिचकर ( वय ३३,  मूळ रा.निपाणी,  सध्या रा. इचलकरंजी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नांव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.  

मिळालेल्या माहितीनुसार, हा इसम यापूर्वी डेक्कन मिलमध्ये नोकरी करत होता. नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद शिवाजी नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.