इचलकरंजीध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या युवकाला अटक…

0
159

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमध्ये आज (रविवार) सलग दुसऱ्या दिवशी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या युवकाला पोलीसांनी पकडले आहे. कपिल एकांडे (रा. गोकुळ चौक, इचलकरंजी) असे त्याचे नाव असून याला गावभाग पोलिसांनी नदीवेस नाका पेट्रोल पंप परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून आरएमडी, मुसाफिर, विमल प्रकारचा गुटखा मिळाला आहे. या कारवाईमध्ये गुटखा, १ मोटारसायकल आणि मोबाईल असा ७५ हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याचे सपोनि. गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली अरीफ वडगावे, बबन माळी, योगेश गायकवाड, दीपक पोवार, शिवानंद पाटील यांनी केली.