नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तरुणांनी उद्योजक बनावे : ना. हसन मुश्रीफ

0
253

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : स्वतः पुढे या, स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या डोक्यातील व्यावसायिक कल्पना सत्यात उतरवा. पुढील काळात सर्वांना नोकऱ्या मिळणे अशक्य आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तरुणांना आज (शनिवार) दिला.  

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडहिंग्लजमध्ये ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ हा रोजगार मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ५० लाख रूपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांनी स्वतः पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेबाबतची सर्व माहिती आणि अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट चे लोकार्पण ना. मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रकल्पामध्ये दररोज २०० ते २५० सिलिंडर उत्पादित करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत गडहिंग्लज स्वयंपूर्ण होणार आहे. त्याचबरोबर बुलडाणा अर्बन बँकेच्या स्वर्गरथाचे लोकार्पणही मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.