अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणास सक्तमजुरी…

0
104

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सक्तमजुरीसह १० हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या सध्या कारावासाची सजा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी सुनावली. सागर विलास परीट (वय २८, रा. लोटेवाडी, ता. भुदरगड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सागर परीटचे गॅरेज पीडितेच्या घराजवळ असल्याने त्यांची ओळख होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. दरम्यान २०१७ साली एकतर्फी प्रेमातून आरोपीने पिडीत मुलगी काँलेजला जात असताना तिचा विनयभंग केल्याने आरोपीविरुद्ध भुदरगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाने चालवला.

या कामी सरकारी वकील सौ. अमिता कुलकर्णी यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. तर आरोपीच्या वतीने एक साक्षीदार तपासण्यात आला. यामध्ये पीडित मुलगी व इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचे जबाब व सरकारी वकील सौ. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरीसह १० हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.