कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे आज (सोमवार) इमारतीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी वाचवले. दरम्यान, याच तरुणाने रानात जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज घडला. गणेश यशवंत चव्हाण (वय २४, रा. खुटाळवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

या तरुणाला दारूचे व्यसन असून त्याने आज दुपारी बांबवडे येथील एका इमारतीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला नागरिकांनी खाली उतरून घेतले. दरम्यान, त्याने रानात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.