कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास व २५ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून दंडाची शिक्षा ठोठावली. कपिल प्रकाश सातवेकर (वय २०, रा. पिंपळगाव ता. कागल) असे शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव आहे.

करवीर तालुक्यातील एका गावातील एक शाळकरी मुलगी ५ जून २०१५ रोजी रात्रीच्या सुमारास तिच्या मैत्रिणीसोबत गावातील एका मंदिराकडे होती गेली होती. त्या वेळी पिंपळगाव येथील कपिल सातवेकर याने त्या अल्पवयीन मुलीला अडवून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी त्या मुलीच्या फिर्यादीनुसार कपिल सातवेकर याला करवीर पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी ज्यादा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्यासमोर झाली. त्यांनी सातवेकर याला ३ वर्ष कारावास, २५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली.