बलात्कारप्रकरणी राजारामपुरीतील तरुणाला सक्तमजुरी…   

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉलेज युवतीला जबरदस्तीने गाडीवरून लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला १० वर्ष सक्तमजुरी आणि ३१ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) सुनावली.

अरविंद महादेव वडर (वय २७, रा. दौलतनगर, राजारामपुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १७ ते २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान घडली.  पीडितेच्या आईवडिलांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

आरोपी अरविंद वडर याने पिडीत मुलगीकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. यावरुन तो तिला वारंवार त्रास द्यायचा. चाकूचा धाक दाखवत काठीने तिला मारहाण करायचा. दरम्यान १७ ते २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान आरोपीने पीडित मुलगीला जबरदस्तीने गाडीवर बसवून लॉजवर नेवून तिच्या इच्छेविरुद्ध  वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईवडिलांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. राजारामपुरी पोलिसांनी तपास करून आरोपीस अटक केली. आणि न्यायालयात दोषारोप दाखल केले.

सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या कोर्टात चालला. यावेळी सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. या कामी सरकारी वकिलांना अॅड. भारत शिंदे, अॅड. महेंद्र चव्हाण, पोलीस नाईक माधवी घोडके, अशोक शिंगे यांचे सहकार्य लाभले. तर पोलीस अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक जे. आर. चव्हाण यांनी काम पाहिले.