पुणे (प्रतिनिधी) : पीएसआय परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) समोर आली आहे. अमर मोहिते असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मूळचा सांगलीचा रहिवाशी असून पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात वास्तव्याला होता.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे अमर हा पीएसआयच्या शारीरिक चाचणी परीक्षेतून बाद झाला होता. तेव्हापासून तो नैराश्यात होता. याच कारणातून त्याने आत्महत्या  केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमरचा भाऊ पिंपरी- चिंचवडमध्ये  सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे.