यड्रावमध्ये शर्टाने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

0
404

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता. हातकणंगले) येथील पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये एका तरुणाने कंपाउंडच्या अँगलला स्वतःच्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज (रविवार) सकाळी उघडकीस आला. सचिन बसवराज पाटील (रा.पार्वती गेटसमोर खोतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्यांने मानसिक ताणतणावाखाली आत्महत्या केल्याचे समजते.

सचिन पाटील यांने आज सकाळी आत्महत्या केल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या घटनेची माहिती शहापूर पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रकाश निकम, कॉन्स्टेबल अवघडे, अविनाश कांबळे, खोतवाडीचे माजी उपसरपंच गजाजन नलगे, यड्रावचे पोलीस पाटील जगदीश संकपाळ दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी पार्वती इस्टेट मधील कामगारांनी मोठी गर्दी केली होती.