नोकरी जाण्याच्या भीतीने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0
189

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नोकरी जाण्याच्या भीतीने तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण गणेश जोशी (रा. भुदरगड, सध्या राहणार प्रथमेश प्लाझा, मंगळवारपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रवीण जोशी हे इन्फोटेक कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर पदी काम करत होते. त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्याची नोकरी गेली होती. यामधून आपली ही नोकरी जाईल या भीतीने प्रवीण जोशी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.