पाचगांव येथे पूर्ववैमनस्यातून तरूणाला मारहाण : दोघांवर गुन्हा

0
64

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील पाचगांव येथे पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुरज शांताराम भालकर (वय २५, रा. अण्णाभाऊ साठेनगर) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी गणेश शांताराम साठे  (रा. पाचगांव) आणि एका अनोळखी इसमाविरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरज भालकर हे आपल्या घरासमोर मोटरसायकल धुण्याचे काम करीत होते. दरम्यान, गणेश साठे आणि त्याचा साथीदाराने भालकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक घडलेल्या प्रकाराने भालकर भयभीत होऊन घराकडे पळाले. मात्र, गणेश साठे  आणि त्याच्या साथीदाराने भालकर यांचा  पाठलागकडून धारदार हत्याराने भालकर यांना मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सुरज भालकर यांनी दिली आहे. गणेश साठे आणि त्याच्या साथीदारावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.