यशवर्धन पाटील याची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड…

0
144

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील चिंचवडे येथील यशवर्धन पाटील याने पुणे येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात यश संपादन केले. त्यामुळे त्याची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशवर्धन पाटील हा न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, कोल्हापूर येथे शिकत असून कुंभी कासारी प्रतिष्ठान नेमबाजी केंद्राचा खेळाडू आहे. त्याला कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार चंद्रदीप नरके, क्रीडा शिक्षक तसेच प्राचार्य गावडे, नेमबाजी प्रशिक्षक युवराज चौगले यांचे मार्गदर्शन लाभले.