कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळअष्टमीच्या निमित्ताने यशवंत भालकर फौंडेशन आयोजित आणि अरूण नरके फौंडेशन प्रस्तुत नृत्यसंगम २०२१ ही ऑनलाईन नृत्यस्पर्धा घेण्यात आली होती. याची अंतिम फेरी घेण्यात आली. दैवेज्ञ बोर्डिंग येथे अरूण नरके यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. नरके फौंडेशनचे चेअरमन चेतन नरके यांच्या हस्ते नटराज पुजन तर बाळासाहेब कोडोलीकर यांचे हस्ते सन्मानचिन्हांचे पुजन झाले.

यावेळी अरूण नरके यांनी कलाकारांच्या कलाकृतीसांठी नेहमी आम्ही साथ देणार असल्याचे सांगितले. तर चेतन नरके यांनी अरूण नरके फौंडेशनच्या सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी संग्राम भालकर यांची निवड केली. या स्पर्धेत समुह नृत्यामध्ये प्रथम क्रमांक शिवश्री नृत्यालय तर दुसरा क्रमांक हिपॉपर्स ग्रुपला मिळाला. दुहेरी नृत्यामध्ये रोहन-दिव्या नेस्क्ट स्टेप अॅकाडमीला प्रथम तर दुसरा क्रमांक श्रध्दा-अविनाश केडीसी अॅकाडमीने पटकावला.

तसेच उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिका समुह नृत्यामध्ये वृषाली अष्टेकर, उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक दुहेरी- रोहन-दिव्या (नेस्क्ट स्टेप), नृत्यसंगम स्टार्स – श्रावणी जोशी-सावणी बेहेरे, ज्युरी अवॉर्ड – गायत्री पाटील तर व्हियुर्स चॉईस अवॉर्ड हिपॉपर्स ग्रुपने पटकावला. तसेच उत्कृष्ट वेशभुषा – कल्पना शुक्ल (केडीसी), उत्कृष्ट कॕमेरामन – रोहित रोहन (नेस्क्ट स्टेप), उत्कृष्ट संकलन – यज्ञेश करंजेकर (श्वास), उत्कृष्ट पोस्टर – सुदर्शन वंडकर (शिवश्री) अॅकाडमीने पटकावले. ही नृत्य स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होते. या सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव-भालकर परीक्षक इम्तियाज बारगीर, मयुर कुलकर्णी, स्निग्धा नरके, जयश्री नरके, सिध्दार्थ साळोखे, संदिप जाधव, पवन बेकीनकर, वैभव भोगटे,सैफ बारगीर, अशिष हेरवाडकर, संग्राम भालकर आदी उपस्थित होते.