यड्राव ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा अंगणवाडी सेविकांतर्फे सत्कार

0
165

इचलकरंजी (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून यड्राव (ता. शिरोळ) मधील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शिरोळ प्रकल्प – २ च्या बालविकास अधिकारी सौ संगीत गुजर व सुपरवायझर सौ. प्रणिता दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी गावडेसाहेब, तलाठी नितीन कांबळे, पोलीस पाटील जगदीश सकपाळ, आरोग्यसेवक किरण एरंडोले, आरोग्य सेविका पद्मश्री भाटे व सी. ओ. बाबर मॅडम उपस्थित होते. या वेळी श्रावणी रेडकर व अक्षरा प्रभाळकर या विद्यार्थिनींची भाषणे झाली. अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सफाई कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान करून एक नवीन संदेश दिला.

सौ रुपाली हराळे यांनी सूत्रसंचालन, मनीषा ढोबळे यांनी आभार मानले.