यड्राव ग्रामस्थांचे पाण्यासाठी ग्रा.पं.ला निवेदन…

0
51

शिरोळ (प्रतिनिधी) :  यड्राव गावामध्ये रात्री-अपरात्री पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना त्रास होत आहे. याबाबत नागरिकांतून तक्रारी येत असल्याने पाणी दिवसा सोडण्याबाबत सर्व नागरिकांच्या सह्यांचे निवेदन ग्रा.पं.अधिकारी ठोणे यांना देण्यात आले. यावेळी कुणालसिंह नाईक-निंबाळकर, महावीर पाटील, रोहित कदम, सुमित रुगे, उदय कुंभार, तात्यासो दानोळे, अक्षय प्रभाळकर, सुमिर सुतार उपस्थित होते.