पेठवडगाव (प्रतिनिधी) : नगरपालिकेने केलेली घरफाळा वाढ रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह रस्ते दुरुस्ती व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिना बसवणे या मागण्यांबाबत येथील यादव आघाडीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आघाडीच्या प्रमुख विद्याताई पोळ यांनी केले.

नगरपालिकेने घरफाळा वाढीच्या नोटिसा नागरिकांना पाठवल्या आहेत. घरफाळा वाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी यादव आघाडीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी सुमित जाधव यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात घरफाळा वाढ रद्द करण्यात यावी, शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत तसेच शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिना बसविण्यात याव्या, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी विद्याताई पोळ यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात शिवसेनेचे शहराध्यक्ष संदीप पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बंडखोर सेनेचे प्रमुख शिवाजीराव आवळे, भाजपचे जगन्नाथ माने आदी सहभागी झाले होते.