नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैयाकुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांचा २८ सप्टेंबररोजी काँग्रेसमध्ये  प्रवेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  

काही दिवसांपूर्वी कन्हैया कुमारने काँग्रेस  नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर कन्हैया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अचानक घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये कन्हैयाकुमारने बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती.  कन्हैयाकुमारने भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात त्यांने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपविरोधाला अधिकच धार येण्याची शक्यता आहे.