मुंबई (प्रतिनिधी) : ओडिशामधील प्रसिद्ध डिजे एझेक्स उर्फ अक्षय कुमार याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा मृतदेह आज (रविवार) त्याच्या भुवनेश्वरमधील घरात संशयास्पदरित्या सापडला आहे. त्याच्या निधनाची बातमी पसरताच चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु आहे. त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही, पण गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज डिजे अक्षय हा बाहेर येत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांना शंका आली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून पाहिलं असता, त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं आढळलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं याची माहिती पोलीस घेत आहेत.