शिवाजी विद्यापीठाच्या लेखी परीक्षा स्थगित

0
45

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शनिवार, दि. २५ जूनपासून सुरु होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ स्तरावरील सर्व अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

विद्यापीठ स्तरावरील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाविद्यालयीन स्तरावर सुरु असलेल्या पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयच्या नियोजानासुसार सुरु राहणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.