‘द संवाद’ कडून लेखन स्पर्धेचे आयोजन

0
84

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधील अग्रगण्य जाहिरात संस्था असणाऱ्या माईंड इट संवादच्या ‘द संवाद’ कडून नवोदित लेखकांसाठी खास स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्लिश या भाषांमध्ये लेख लिहायचे आहेत. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नसून सर्व वयोगटांसाठी स्पर्धा खुली राहणार आहे, असे द संवादचे अजित तांबेकर यांनी सांगितले.

कोरोना जागतिक महामारीच्या काळाने समाजामध्ये काही प्रमाणात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सकारात्मक मुद्दे तसेच साकारायमक विचार लोकांसमोर यावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी सद्यस्थितीतील ‘चला करूया सकारात्मकतेचा प्रचार’ आणि ‘प्रसार करूया प्रेम-दयेचा’ या विषयांना अनुसरून लेखकांनी लेख लिहायचे असून या साठी शब्द मर्यादा नाही. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम  ३००० रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम २००० रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम १००० रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच प्रत्येक सहभागी लेखकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीजास्त लेखकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन द संवाद टीम कडून करण्यात आले आहे. यासाठी लेख पूर्णपणे स्वयंलिखित असावेत, २५ डिसेंबर पर्यंत सर्वांनी लेख पाठवणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी आणि लेख पाठविण्यासाठी आपले लेख नाव आणि पत्त्यासह पुढील व्हाट्सअप क्रमांकावरती किंवा मेल वरती पाठवू शकता.

व्हाट्सअप् नंबर : ७०५८२३९५३०

इमेल : m.sanvaad@gmail.com