कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभरात लॉकडाऊनमुळे मागील ८ महिने बंद असणारे कुस्ती आखाडे शासनाच्या नियमानुसार आजपासून कुस्तीगिरांना सरावासाठी खुले झाले. जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेली मोतीबाग तालीम आज (शनिवार) पहाटे ६ वा. श्री हनुमान मूर्तीचे आणि आखाडा पूजन करून सुरु करण्यात आली. यावेळी पैलवानांनी कुस्तीचा सराव करण्यात आला.

या शुभारंभप्रसंगी तालीम व्यवस्थापन समितीचे अशोक पोवार, निलेश देसाई, अशोक माने, वस्ताद उत्तम चव्हाण, पै. रामा कोवाड, विजय पाटील, बाबुराव चव्हाण, वस्ताद दादू चौगुले, ज्युनियर कुस्ती कोच सुहेल इत्यादी मल्ल उपस्थित होते.