चिंताजनक : जिल्ह्यात चोवीस तासांत ३११ जणांना कोरोनाची लागण…

0
1582

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तब्बल ३११ जणांना लागण झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७७ जण बरे झाले असून २५७२ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरातील १४४, आजरा तालुक्यातील १५, भुदरगड तालुक्यातील ४, चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ३०, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २०, कागल तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील २८, पन्हाळा तालुक्यातील १३, राधानगरी तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३१ आणि इतर जिल्ह्यातील १५ अशा ३११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील आंबार्डे येथील १, आजरा तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील १ आणि देवकर पाणंद, कोल्हापूर येथील १ अशा चौघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची रुग्ण स्थिती –

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५४, ०२८, डिस्चार्ज – ५०, २५७, उपचारासाठी दाखल रुग्ण – १९६५, मृत्यू – १८०६.