जागतिक कुस्ती स्पर्धा : बजरंग पुनियाने पटकावले कांस्यपदक !

0 79

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत बजरंगने मंगोलियाच्या तुलगा तुमुर ओचीरवर ८-७ ने मात केली. या सामन्यात बजरंग सुरुवातीला ०-६ अशा पिछाडीवर होता, यानंतर मात्र त्याने अनुभवाच्या जोरावर ओचीरला पराभूत केलं.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासातलं बजरंगचं हे तिसरं पदक ठरलं आहे. २०१३ साली बजरंगने कांस्यपदक तर २०१८ साली याच स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. जागतिक स्पर्धेत ३ पदकांची कमाई करणारा बजरंग पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. बजरंगने २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More