कोल्हापूर (प्रतिनिधी) : डावखुऱ्या लोकांना समाजामध्ये हिणवले जाते. त्यांच्या डावखुऱ्यापणावर टिकाटिप्पणी, टोमणे मारले जातात. परंतु त्यांचा काहीही दोष नसताना विनाकारण लोक त्यांना हिणवतात. डावखुरा असण्यामागे शास्त्रीय कारण आहे. ते समजून घेणे गरजेचे आहे. जगामध्ये १३ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण डावखुऱ्या व्यक्तींचा दिन म्हणून साजरा केला जातो. जगात १० टक्के लोक डावखुरे असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. यानिमित्ताने जगातील प्रसिद्ध डावखुरे व्यक्ति कोण आहेत?  यावर टाकलेला एक प्रकाशझोत…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डावखुरे आहेत. अमेरिकेचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष झालेले बराक ओबामा डावखुरे आहेत. विशेष म्हणजे बराक ओबामाच नाही तर अमेरिकेचे जेम्स गारफील्ड,  हर्बर्ट हूवर, हॅरी ट्रूमन,  जेराल्ड फोर्ड,  रोनाल्ड रीगन,  जॉर्ज एच. बुश आणि बिल क्लिंटन हे  राष्ट्राध्यक्ष देखील डावखुरे होते.  भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी देखील डावखुरे होते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील डावखुरे आहेत. अनेक चित्रपटांमध्ये त्यांना डाव्या हाताने लिहिताना आणि जेवताना पाहिले गेले आहे.  तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेटस् हेदेखील डावखुरे आहेत. तसेच भारताचा माजी आघाडीचा फलंदाज सचिन तेंडूलकर, प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत हे देखील डावखुरे होते. एका मुलाखतीमध्ये सचिन तेंडूलकरने डावखुरा असल्यामुळे शाळेत येणारा अनुभव सांगितला होता. त्याने हे देखील सांगितले होते की, २०११ च्या विश्वचषकात त्याने डाव्याबाजूने बॅटिंग करून लागोपाठ तीन षटकार मारले होते.