मुंबई (प्रतिनिधी) : हरियारयाणातील कैथल जिल्ह्यातील सुलतान नावाचा रेडा हा राजेशाही थाटात आयुष्य जगला. त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बुडाखेडा गावातील सुलतान रेड्याने केवळ कैथलच नव्हे तर संपूर्ण हरियाणाचे नाव जगाच्या पाठीवर आणले होते.

सुलतानचे मालक नरेश यांनी, सुलतानला मी लहानपणापासून आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले होते. त्याच्यासारखा कोणीही नव्हते आणि कदाचित कोणीही नसेल. सुलतानच्या वीर्यापासून लाखो रुपये कमावण्यात आले होते. तो एका वर्षात ३० हजार सीमेन डोस देत असे. ज्यातून आतापर्यंत लाखो रुपये मिळाले आहेत. २०१३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत झज्जर, कर्नाल आणि हिसारमध्ये सुलतान राष्ट्रीय विजेता देखील ठरला होता.

राजस्थानातील पुष्कर जत्रेत एका व्यक्तीने सुलतानवर २१ कोटी रुपयांची बोली लावली लावल्याचे सांगितले. तसेच सुलतान हा सकाळच्या न्याहारीत देशी तुप आणि दूध प्यायचा. तर पंधरा किलो सफरचंदही खात होता. तसेच प्राण्यांच्या मेळाव्यात सुलतानचा दबदबा असायच्या. त्याच्यामुळे माझ्या कुटुंबीयांना प्रसिद्धी मिळाली होती. त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. तर त्याने हरियाणातील एका म्युझिक अल्बममध्ये देखील काम केल्याचे नरेश यांनी सांगितले.