पॅव्हेलियन मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत : आ. ऋतुराज पाटील

0
29

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावड्यातील मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कसबा बावड्यातील ‘पॅव्हेलियन मैदान’ हक्काचे मैदान आहे. त्यामुळे मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, असे प्रतिपादन आ. ऋतुराज पाटील यांनी आज (गुरूवार) येथे केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ७८ लाखाच्या निधीतून फ्लड लाईट पोल उभारणीसाठी पायाभरणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

या मैदानामध्ये अद्ययावत बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट उभारणी, या खेळांसोबतच कबड्डीसाठी सिंथेटिक फ्लोअर, खोखो, रनिंग ट्रॅक, लांब उडी यासाठी योग्य सुविधा, ३ हजार चौरस फूटचे बॉक्सिंग हॉल आदी काम प्रगतीपथावर आहे. याचसोबत वॉकिंग ट्रॅक, टेज कव्हर सिंटींग, दिव्यांग बंधू-भगिनींसाठी हॉल, बैठक व्यवस्थेसाठी आणि सुशोभीकरणासाठी मैदानावर नैसर्गिक आणि आर्टिफिशिअल लॉन आदी सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यावेळी कसबा बावड्यातील माजी नगरसेवक, नगरसेविका, श्रीराम सोसायटीचे संचालक, क्रीडाप्रेमी व बावड्यातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.