कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  कोरोना कालावधीत जीवाची पर्वा न करता काम केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करावे, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी आज (सोमवार) वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने सीपीआर मधील अधिष्ठाता कार्यालयासमोर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. यावेळी शासनाविरोधात जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली.  तर आठ दिवसात मागण्यांबाबत दखल न घेतल्यास १८ जानेवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी वैद्यकीय  अधिकाऱ्यांना कायम करण्यात यावे, शासनाने ३१ डिसेंबर २०२० चा एकत्रित मानधनाचा जीआर रद्द करून सर्वांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. तर शासनाने येत्या आठ दिवसात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्याबाबत दखल नाही घेतल्यास १८ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात डॉ. गिरिष कांबळे,  डॉ. विकास जाधव,  डॉ. विजय गाढवे, डॉ. व्यंकटेश पोवार, डॉ. आसमा मुल्ला, डॉ. मनाली माने, डॉ. प्रांजली व्हटकर, डॉ.अनिकेत पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.