महिला फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

0 128

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भारतातील पहिली युवा महिला एफसीए लायसन्स आणि एशियन फुटबॉल पॅनल सदस्य कोच अंजू तुरंबेकर हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी मास्टर स्पोर्टस्, दि फुटबॉल असोशिएशन गडहिंग्लजतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी एक दिवसीय ग्रासरूट फुटबॉल फेस्टिवल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन आनंद पेडणेकर, किरण डोमणे, रवी घेजी, अक्षय कित्तूरकर, अमर पाटील, महेश अंबी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे दिडशे शिबिरार्थींना फुटबॉल किटचे वाटप करुन प्रशस्ती पत्रक देण्यात आले. यावेळी अंजूने आपली आजीच्या हस्ते केक कापून आपला वाढदिवसही साजरा करण्यात आला.

यावेळी बेटा स्पोर्टस क्लब (पुणे), विजया फुटबॉल अ‍ॅकॅडमी (बेळगाव), फिनिक्स स्पोर्टस क्लब (पुणे), प्लेअर्स स्पोर्टस  वेअर (बेळगाव) या फुटबॉल क्लबसहीत शफुगता शेख, निओमी वेस, सौरभ बिरंजे, गुलाफशा अन्सारी, अनिल अडसुळे, अनिकेत पोवार, नग्मा शेख, तौसिफ बाणकर, मिलींद कुलकर्णी आदी फुटबॉल खेळाडू आणि मार्गदर्शक उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More