भुदरगड तालुक्यातील ४९ गावांमध्ये होणार महिला सरपंच…

0
246

गारगोटी (प्रतिनिधी)  :  भुदरगड तालुका सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत ९७ ग्रामपंचायतीपैकी  ४९ ठिकाणी महिला सरपंच होणार आहेत. गारगोटी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज (बुधवार) आरक्षणाची सोडत तहसिलदार अश्विनी आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत पार पडली. आता राजकीय हालचालींना हालचालींना वेग आला आहे.

प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : (प्रवर्ग, ग्रामपंचायतीचे नाव या क्रमाने)

अनुसूचित जाती महिला – बेगवडे, गंगापूर, दिंडेवाडी, करडवाडी, भाटीवडे

अनुसूचित जाती – तांब्याची वाडी, चिक्केवाडी, मुरकुटे, शेळोली, कोनवडे, पिंपळगाव, सोनुर्ली

नागरिकाचा मागास प्रवर्ग – वाघापूर, आकुर्डे, कूर, कडगाव, मडूर, निळपण, आदमापूर, मडिलगे खुर्द, पाचवडे, केळेवाडी, नागणवाडी, देवकेवाडी, भेंडवडे,

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – कडगाव, खानापूर, कलनाकवाडी, मठगाव, मानवळे, केळेवाडी, भेंडवडे, मेघोली, पाल, हणबरवाडी, नवले, बिद्री – पेठ शिवापूर, आरळगुंडी, वरपेवाडी, राणेवाडी, मिणचे खुर्द

सर्वसाधारण महिला – मडिलगे बुद्रुक, मुदाळ, कोंडोशी, दासेवाडी, अनफ बुद्रुक, तिरवडे, कुर्डूवाडी, दारवाड, मिणचे बुद्रुक, पडखंबे, देऊळवाडी, ममदापूर, नितवडे, नवरसवाडी, भालेकरवाडी, थड्याचीवाडी, सालपे वाडी, डेळे – चिवाळे, वासनोली, पारदेवाडी, न्हाव्याची वाडी, अंतिवडे, म्हासरंग, उकीरभाटले, फणसवाडी, वेसर्डे, शेनगाव, आंबवणे, नांदोली, करंबळी, निष्णप, कुंभारवाडी, पुष्पनगर, दोनवडे

सर्वसाधारण पुरुष – गारगोटी, नाधवडे, म्हसवे, टिक्केवाडी, सोनारवाडी, शिवडाव, कोळवण, पाळेवाडी, पाळ्याचा हुडा, लोटेवाडी, पंडिवरे, पाचर्डे, शिंदेवाडी, दोनवडे, पळशिवणे, बारवे, मोरेवाडी, हेदवडे, गिरगाव, तांबाळे, वेंगरूळ, पाटगाव, मानाने, कारिवडे, अनफ खुर्द, अंतुर्ली, पांगिरे खेडगे- एरंडपे, चांदमवाडी, बेडीव, बसरेवाडी, नांगरगाव