सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेतर्फे ८ मार्चला महिलांचा सन्मान

0
48

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शहरातील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांनी ९८५०६१९२९२, ७२४९५४३१६५ या मोबाईल नंबरवर संपर्क साधून नांव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव पाटील (सडोलीकर) व शहर महिला अध्यक्षा किरण तहसिलदार यांनी पत्रकार परिषदेत केले.

महिला दिनानिमित्त ८ मार्चरोजी हॉटेल जोतिबा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शहरातील ५१ महिलांना गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रामदास पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.