शिवनाकवाडी येथे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू : चारजण जखमी

0
241

शिवनाकवाडी (प्रतिनिधी) : शिवनाकवाडी (ता. शिरोळ)  गावात उमराणे गल्ली येथे राहत असलेल्या सोनाबाई अण्णा बंडे (वय ५५)  यांच्या अंगावर भिंत कोसळून त्यांच्या डोक्यावर मार लागल्याने जागीच मृत्यू झालाय.  तसेच यामध्ये विठ्ठल अण्णा बंडे (वय २१), चिमुताई उदय पुजारी (वय ३६), समृद्धी उदय पुजारी (वय १७),  समर्थ उदय पुजारी (वय १४) हे  जखमी झाले आहेत.

शिवनाकवाडी या गावात मध्यरात्री भिंत कोसळली त्यामुळे त्यांचा मुलगा विठ्ठल जागा झाला. त्यांच्या शेजारील प्रकाश आरगे हा बाहेर आला व त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्या घरातील भिंत पडली म्हणून सगळे ओरडत होते. तो आवाज ऐकून शेजारील संदीप दळवाई ही तिकडे गेला. मृत महिला आणि तिची नात मातीच्या ढिगार्‍यात अडकलेली होती. त्यांना त्यातून दोघांनी बाहेर काढले त्यावेळी सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तरीही त्यांना तत्काळ दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला गेला. डॉक्टर यांनी महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले तेथून त्या महिलेला दतवाड येथे पोस्टमार्टमसाठी नेण्यात आले. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस स्टेशन मध्ये झाली आहे. पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे अधिक तपासणी करत आहेत.