कोल्हापुरात धावत्या बसखाली उडी मारल्याने महिलेचा मृत्यू

0
993

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील मलबार हॉटेलसमोर महिलेने धावत्या  एसटी खाली उडी मारल्याने तिचा मृत्यू  झाला. ही घटना आज (सोमवार) सकाळी ११ वाजता घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद  झाली आहे. मृत्यू झालेली महिला अनोळखी असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एसटी बस एसटी स्टँडडकडे निघाली होती. यावेळी मलबार हॉटेलसमोरील रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या महिलेने एसटी बसखाली उडी मारली. त्यामुळे चाकाखाली  सापडल्याने  ही महिला गंभीर जखमी  झाली. तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल  करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी तिचा मृत्यू  झाला. दरम्यान,  या महिलेचे अंदाजे वय ५५  ते ६० वर्षे असून तिच्या अंगावर हिरव्या रंगाची नऊवार  साडी  आहे. तर  पायात जोडवी, गळ्यात मणीमंगळसूत्र  आहे. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.