इराणी खणीमध्ये आत्महत्या करणाऱ्या महिलेस जीवदान

0
146

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इराणी खणीमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढून वाचविले. ही घटना आज (गुरूवारी) सकाळी घडली. सुमन विलास माडेकर (वय ५५, रा. पोवार कॉलनी, साने गुरुजी वसाहत) असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी एका महिलेने इराणी खणीमध्ये उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी येथे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अमोल पाटील, गिरीश गवळी, श्रीधर चाचे यांनी पाण्यामध्ये उतरुन लाइफ रिंगच्या साह्याने या महिलेला पाण्याबाहेर सुखरूप काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या महिलेला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.