कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप  नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या अनुषंगानेच किरीट सोमय्यांनी कोल्हापूरचा दौरा निश्चित केला. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

त्यामुळे किरीट सोमय्या यांना पोलीस प्रशासनामार्फत कोल्हापुरात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. तरीही अखेर किरीट सोमय्या कोल्हापूरला घेण्यासाठी रेल्वेने रवाना झाले. कराडमध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यावरून किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त करून पत्रकार परिषदेची घोषणा केली.

किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद जाहीर होताच कराड विश्रामगृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर भाजप कार्यकर्ते ही मोठ्या संख्येनं जमले. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकार मला घाबरलं, माझी लढाई प्रशासनाविरोधात नाही म्हणत  सोमय्यांनी महाविकास आघाडी सह आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे- पाटील, हसन मुश्रीफ यांच्या हल्लाबोल केला. आणि पुन्हा  कोल्हापुरात येऊन मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रीतसर भ्रष्टाचाराची तक्रार देणार असल्याचे सांगून मुश्रीफ यांचा आणखी शंभर कोटीचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत यांनी गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याकडे बोट दाखवले आहे. मला कितीही आडवलं तर दोन दिवसांनी पुन्हा कोल्हापूरला जाण्याचा सोमय्यांनी निर्धार व्यक्त केला.

सोमय्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यानं राष्ट्रवादीचा कागलमधील मोर्चा रद्द करण्यात आला आहे. तर  ना. हसन मुश्रीफांचा आणखी घोटाळा बाहेर काढणार असल्याचा सोमय्या  यांनी  ट्विट करून इशारा दिला आहे.