पन्हाळगडावर वृक्षांसोबत शिवजयंती

0
61

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पन्हाळगडावर लावण्यात आलेल्या ३९१ झाडांच्याबरोबर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवराष्ट्र हायकर्स, पन्हाळा नगरपालिका, कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या सदस्यांनी प्रत्येक झाडाला भगवा झेंडा फडकवून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.

झाडांच्या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. हिरवीगार झाडी आणि फडकणारे भगवे झेंडे या शिवमय वातावरणात पन्हाळगडावर शिवजयंती दिवशी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय….अशा घोषणांनी पन्हाळगड दुमदुमून गेला. यावेळी पन्हाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप घारगे, रवींद्र धडेल, शिवराष्ट्र हायकर्सचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, सीएस अमित पाटील, जयदीप पाटील, रोहित ढिसाळ, मोहन खोत आदी उपस्थित होते.