राशिवडे (प्रतिनिधी) : मांजरवाडी येथे श्री गोविंद गोपाळ सहकारी दूध संस्थेचे उद्घाटन शशिकांत पाटील आणि दगडूपंत मरळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या संस्थेला दुग्ध व्यवसाय, पुणे विभागीय उपनिबंधक कार्यालयामार्फत मान्यता मिळाली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत दूध संकलन व संघाला दूध पुरवठा करण्याची परवानगी मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर संस्थेचे दूध संकलन आणि काटा पूजन करण्यात आले. यावेळी सर्वसामान्य दूध उत्पादकाला न्याय मिळावा, त्याला जास्तीत जास्त आर्थिक मोबदला मिळावा. या हेतूने या संस्थेची स्थापना केली असल्याचे संस्थापक बळवंत वीर,राजाराम वीर आणि तानाजी वीर यांनी सांगितले. तर या नवीन संस्थेला सभासदांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगितले.

यावेळी ग्रा.पं. सदस्य साताप्पा चौगले, संस्थेचे पदाधिकारी संभाजी वीर, सुनील गोते, शहाजी वीर, प्रदिप वीर, विशाल वीर, प्रकाश गोते, शुभम वीर, नामदेव गोते, कृष्णात आदिगरे, विजय वीर, जयवंत भोगम, बंडा गोते, भीमराव वीर,संग्राम वीर, अक्षय वीर, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.