मुंबई (प्रतिनिधी) : कसोटी कर्णधार विराट कोहली याला शतकी खेळ करण्यात अपयश आले आहे. आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. विराटला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवले होते, तर त्याने स्वतः टी-20 चे कर्णधारपद सोडले होते. या मालिकेतील पराभवानंतर विराट याच्या कसोटी कर्णधारपदाला मोठा धोका निर्माण झाला आहे.  

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहली याचे कसोटी कर्णधारपदही धोक्यात आले आहे.  त्यामुळे या पदासाठी के. एल. राहुल याच्या नावाची चाचपणी सुरू झाली आहे. राहुल याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले.

कोहली याच्या अनुपस्थितीत केएल राहुल याने चांगल्या प्रकारे कर्णधारपद सांभाळले.  फिटनेसमुळे  रोहित एकदिवसीय मालिकेबाहेर असताना बीसीसीआयने के. एल राहुलकडे कर्णधारपद सोपवले होते. तर दुसरीकडे, रोहित याचे वय ३४ वर्षे असल्याने त्याला  जास्त काळ कर्णधारपद सांभाळता येणार नाही. तसेच  बीसीसीआयने इतर बोर्डांप्रमाणे वेगळ्या फॉरमॅटचा वेगळा कर्णधार हवा अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे के. एल राहुलकडे कर्णधारपद जाण्याची जास्त शक्यता आहे.