कोरोना लस मोफत मिळणार ? : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे घुमजाव

0
140

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याची माहिती दिल्यानंतर काही वेळातच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यू टर्न घेत सर्वांना लस मोफत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. पहिल्या टप्प्यातच लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल खुलासा केला आहे. त्यामुळे देशवासीयांचा हिरमोड झाला आहे.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आज (शनिवार) आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कोरोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार आहे, असे सांगितले. परंतु काही वेळातच त्यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले.