Published October 9, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कलापथक कलाकारांबरोबरच इतर सर्व प्रकारच्या कला सादर करणाऱ्या कलाकारांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करणार आहे. राज्य शासन लवकरच परवानगी देण्याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. ते कोल्हापूर येथे कलापथक कलाकार संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी आयोजित केलेल्या आमरण उपोषणाला राज्यमंत्री यड्रावकर यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, कोरोनामुळे कलापथकासह वेगवेगळ्या कला सादर करून उपजीविका करणाऱ्या हजारो कलाकारांच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे. कोरोनापासून थोड्या प्रमाणात का होईना राज्य सावरत आहे. लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सवलती दिल्या जात आहेत. कलापथक कलाकारांच्या व्यथा मला माहित आहेत. अगदी या पथकांच्या ड्रायव्हरपासून मेकअपमनपर्यंत या सर्वांच्या व्यथा मी जाणतो. त्यामुळेच कलापथकासह केवळ कला सादर करून उपजीविका करणाऱ्या सर्व कलाकारांच्या साठी राज्यशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन या सर्व कलाकारांना आपले कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल. कलाकारांची आबाळ होऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

यावेळी कलापथक कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सुतार, उपाध्यक्षा श्रीमती शारदा हिलगे, रवी सुतार, चंद्रकांत लोहार, निवास कुंभार, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश पाटील, शाहीर आझाद नायकवडी, संताजी मोहिते, रमेश खटावकर, रजनी गोरड यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023