गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील चालू वर्षी नव्याने संशोधित करण्यात आलेल्या पैय्यू पौर्णिमा या भाताच्या वाणाचे आज सादरीकरण करण्यात आले. या भाताचे वाण आंध्रप्रदेश, तेलंगणा, आणि छत्तीसगड येथे पोहोचणार आहे. आंध्र आणि महाराष्ट्रातील भाताच्या महत्त्वाच्या वाणांची देवानघेवाण करण्याचा उपक्रम राबविणार असल्याचे डॉ. शिरिषा यांनी सांगितले.

डॉ. शिरीषा या महाराष्ट्रातील भात पिकांच्या विविध वाणांची पाहाणी आणि अभ्यासासाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांनी गारगोटी परिसरातील भाताच्या प्लॉटना भेटी दिल्या. यावेळी संदेश सिड्स वतीने चालू वर्षी नव्याने निर्मित करण्यात आलेल्या पैय्यू पौर्णिमा या भुदरगड तालुक्यातील पहिल्या वहिल्या संकरित जातीचे सादरीकरण करण्यात आले. तर बिंदू या जातीच्या विविध प्लँटची पाहणी केली. बिंदू आणि पौर्णिमा या दोन्ही जाती आंध्रप्रदेशमध्ये प्रसारित करण्यात येतील त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही शिरीषा यांनी सांगितले. आंध्र प्रदेशमधील विष्णू भोग ही महत्त्वाची व्हरायटी कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात देणार असून भुदरगड तालुक्यात फोकस करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी आनंदा कासार, श्रावणी देसाई, शेतकरी उपस्थित होते.